कर्ज सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडेन
कर्ज सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडेन

कर्ज सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडेन

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता.३० : ''''साखर कारखान्यातील विरोधकांनी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज सिद्ध करून दाखवावे मी राजकारण सोडून देईन अन्यथा सिद्ध न करता आल्यास तुम्ही निवृत्ती घेऊन दाखवा,'' असे आवाहन आमदार ॲड.अशोक पवार यांनी केले. रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथे न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये ते आज रविवारी (ता.३१)बोलत होते.
आमदार ॲड.पवार पुढे म्हणाले, की साखर कारखाना निवडणूक आपल्या चुलीशी व प्रपंचाशी निगडित आहे. त्यामुळे ही निवडणूक आपली आहे. कारखान्यावर एक रुपयाचे थकीत कर्ज नाही. विरोधकांनी दिवाळीत शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर साखर वाटप करण्यात अडथळे आणले. कारखान्याने शंभर कोटी रुपयाचा वीज प्रकल्प उभारला.ज्यावेळी वीज घ्यायची त्यावेळी सरकार बदलले.तत्कालीन नवीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. आपल्या कारखान्याचा वीज खरेदी करण्याचा करार करण्यास तत्कालीन सरकारने तीन वर्षे जाणून बुजून उशीर केला. त्यामुळे कारखान्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
याप्रसंगी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव मोकाशी, संतोष रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे ,शरदराव निंबाळकर, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सागर निंबाळकर, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक जीवन तांबे , कात्रजचे संचालक स्वप्नील ढमढेरे, सरपंच उत्तम लोखंडे, निखिल तांबे ,पांडुरंग लोखंडे, बबनदादा रणदिवे ,वसंतराव रणदिवे, राहुल करपे- पाटील, मालू शिंदे आदि उपस्थित होते.
01872