शिरूरच्या पूर्व भागात ९० टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या पूर्व भागात ९० टक्के मतदान
शिरूरच्या पूर्व भागात ९० टक्के मतदान

शिरूरच्या पूर्व भागात ९० टक्के मतदान

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता.६ : शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, नागरगाव, वडगाव रासाई आदी गावातील केंद्रावरती रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता.६) शांततेमध्ये उत्साहात मतदान झाले. तालुक्याच्या पूर्व भागात अंदाजे ९० टक्के मतदान वरती मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेतकरी विकास व घोडगंगा किसान क्रांती या दोन पॅनेलमध्ये वीस संचालक पदांच्या जागेसाठी ही निवडणूक अटीतटीची होईल असे अनेक सभासदांनी सकाळच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवले. वयाची शंभरी पार केलेल्या वृद्ध आजोबा ज्ञानदेव अंबुजी लोखंडे या सभासदांनी स्वतः मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. शेतकरी विकास पॅनेलच्या आमदार ॲड. अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, झुंबरअण्णा रणदिवे, शरदराव निंबाळकर, संतोष रणदिवे आदींनी मतदान केंद्राला भेटी दिल्या. विरोधी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलच्या पॅनेलचे दादापाटील फराटे, सुधीर फराटे, राहुल गवारी, महेश ढमढेरे आदि पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या. रांजणगाव सांडस केंद्रावरती ८९ टक्के मतदान झाले.उद्या सोमवारी (ता.७) शिरूर ( पीर फाटा - न्हावरे फाटा) येथील कानिफनाथ मंगल कार्यालय मध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसारखी एकतर्फी (२१/००)होणार की शांतीत क्रांती होणार याकडे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.