जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावात वाढ
जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावात वाढ

जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावात वाढ

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता.१२ : आजकाल बदलते हवामान, सतत जमिनीत असणारा ओलावा आदींमुळे जमिनीत हानिकारक बुरशींची वाढ होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या तसेच पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरत आहे, असे मत कृषी सहायक कृषी विद्यावेत्ता संतोष सुतार यांनी व्यक्त केले.

उरळगाव (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याला बांधावर जाऊन संतोष सुतार व कृषी सहायक मोनिका झगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पिकावरील विविध बुरशीजन्य रोगांबद्दल माहिती सांगितली.

ट्रायकोडर्माची ओळख :
ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर रोगकारक बुरशींवर जगणारी अशी आहे. ट्रायकोडर्मा व्हीरीडी, ट्रायकोडर्मा हरजानियम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात.
उपयोग : रोगकारक बुरशींमुळे टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा यामध्ये मूळकूज, कॉलर रॉट, डाळिंबामध्ये मर रोग आदि रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.ट्रायकोडर्मा जमिनीत अपायकारक बुरशींवर उपजीविका करून त्यांची वाढ नियंत्रणात ठेवते.ट्रायकोडर्मा दुसऱ्या बुरशींवर उपजीविका करताना प्रतिजैविके म्हणजे हानिकारक बुरशींसाठी विषकारक घटक निर्माण करते. तसेच, या बुरशीमुळे सेंद्रिय पदार्थ देखील कुजवून सेंद्रिय खत निर्मितीत ट्रायकोडर्मा मदत करते. सूत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्रति एकरी २५० ग्राम याप्रमाणे १०० किलोग्रॅम शेणखतात मिसळून जमिनीत खोलवर मिसळावी.
ट्रायकोडर्माचा वापर : बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा १ किलो बियाण्यास ५ ग्राम या प्रमाणात चोळावे. त्यामुळे जमिनीतून तसेच बियाण्यापासून निर्माण होणाऱ्या मर रोगांचे नियंत्रण होते.कुजलेल्या शेणखतात २५० ग्राम ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून शेणखताच्या ढिगावर स्प्रे करावा व शेतात वापरावे.रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा २५० ग्रामचा वापर १०० लिटर या प्रमाणात केल्यास रोपांची रोपावस्थेत, पुनर्लागवडीनंतर होणारी मर थांबवता येते.
विशेष काळजी : ट्रायकोडर्माचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर ३ दिवसांपर्यंत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करू नये, त्यामुळे ट्रायकोडर्माचा परिणाम चांगला मिळण्यास मदत होते असे सुतार यांनी सांगितले.

04601, 04602, 04604