जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी पेन्शन योजना
सुरू करण्याची मागणी
जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी

जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. ३ : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने शिरूर येथे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेले, परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर बांधवांना सन १९८२ च्या कायद्यानुसार जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही. अशा शिक्षकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या योजनेचा फेरविचार होऊन जुनी पेन्शन योजना सुरु करावी, अशा मागणीचे पत्र शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम आणि महाआक्रोश आंदोलनाचे नेतृत्व करणारे रामराव इथापे यांनी दिले.
अघोषित शाळा, अंशतः अनुदानित, त्रुटी पूर्तता शाळा यांना ११६० कोटी रुपये देऊन ६० हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे अभिनंदन व आभाराचे पत्रही यावेळी केसरकर यांना दिले.