Tue, Feb 7, 2023

दत्तोबा पंदरकर यांचे निधन
दत्तोबा पंदरकर यांचे निधन
Published on : 27 December 2022, 10:42 am
रांजणगाव सांडस, ता. २७ : उरळगाव (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी दत्तोबा दगडोबा पंदरकर (वय ९२) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, परतोंडे असा परिवार आहे.
न्हावरे, उरळगाव परिसरामध्ये अनेक सोयरीक जोडणे (विवाह घडून आणणे) हा त्यांचा आवडता छंद होता. जुन्या काळामध्ये गावातील छोटे-मोठे तंटे गावातच मिटवून सर्व जाती धर्मामध्ये सामाजिक सलोखा घडूनविण्यामध्ये ते मोलाची भूमिका बजावत होते. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास पंधरकर, आदर्श गोपालन शेतकरी दादाभाऊ पंदरकर हे त्यांचे पुत्र होत.