
रांजणगाव परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस
रांजणगाव सांडस, ता.१६ : रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, अरणगाव आदी गावात आज (ता.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकड व ढगाच्या गडगडासह हलक्या स्वरूपात पाऊस पडला.
अवकाळीमुळे गहू, कांदा, ज्वारी, द्राक्षे तसेच चारा पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने चांगलीच शेतकऱ्याची धांदल उडवली. वीट भट्टी व्यवसायिकांनी पावसाचा अंदाज येताच विटा प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याने काहीचे नुकसान टळण्यास मदत झाली. यावेळी कामगारांची धांदल उडाली होती. काढणीच्या स्थितीतील गव्हाच्या ओंब्या पडल्या तर वैरण भिजून काळी पडणार आहे. शेतामध्ये काढलेला शेतातील काही जणांचा कांदा भिजला असल्याची माहिती आरणगाव येथील पोलिस पाटील संतोष लेडे यांनी दिली. कांद्याच्या गोटाचे ही काही प्रमाणात नुकसान झाले.
02027