उरळगावात ईद, अक्षयतृतीयनिमित्त 
हिंदू मुस्लिम बांधवांची गळाभेट

उरळगावात ईद, अक्षयतृतीयनिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांची गळाभेट

रांजणगाव सांडस : उरळगाव परिसरातील आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, दहिवडी, पारोडी, आरणगाव, शिवतक्रार म्हाळुंगी या गावात रमझान ईद व अक्षय तृतीयेचा सण हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला.

शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक, व्हाॅट्सएप, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर फिरत होते. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात अशी माहिती युवक सामाजिक कार्यकर्ते समशेर शेख यांनी दिली. उरळगाव येथे उपसरपंच रफिक शेख, समशेर शेख, आयन सय्यद, हसीना जकाते आदी मुस्लिम बांधवांना सरपंच अशोक चव्हाण, सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र गिरमकर, सागर कोळपे, पोलिस पाटील सागर गिरमकर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. रांजणगाव सांडस येथे पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक संभाजी रणदिवे, पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे माजी संचालक जिवंत तांबे, सरपंच उत्तम लोखंडे, हरिभाऊ भंडलकर आदींनी रज्जाकभाई शेख, इब्राहिम शेख, मेहबूब शेख, मुबारक गडकरी, हसनभाई शेख आदी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आलेगाव पागा येथे सरपंच अप्पासाहेब बेनके, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष आरवडे, योगीराज मोरे यांनी मुस्लिम फ्रंटलर सेलचे अध्यक्ष मिठूभाई शेख यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शीरखुर्मा, गुलगुल्यांचा आस्वाद-रमझान ईदच्या सणाचे खास आकर्षण असलेल्या शीरखुर्मा पार्टीचे मुस्लिम बांधवांच्या घरी आयोजन केले होते. हिंदू मित्रमंडळींनी आवर्जून या शीरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com