girl crime police pune
girl crime police puneesakal

Pune Crime: पुणे हादरलं! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने खळबळ

रांजणगाव सांडस: शिरूर पोलिस ठाण्यात चौदा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी रतिलाल जुन्या कुवर (सध्या रा. रांजणगाव सांडस ता.शिरूर, मूळ रा. वालापागण, ता. साक्री, जि.धुळे) याच्याविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. रतिलाल हा बळजबरीने पीडितेवर अत्याचार करत होता.

''घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. यामुळे तिने घाबरून कोणासही काही सांगितले नाही. मात्र, गरोदर राहिल्याचे निदर्शनास आल्याने तिच्या आईने मुलीला विश्वास घेत विचारपूस केली.

girl crime police pune
Mumbai Crime News: भांडणात बापाचा संयम सुटला अन् मुलीवर पेट्रोल शिंपडून...

तेव्हा घेतलेला प्रकार उघड झाला. यानंतर पीडितेच्या आईने शिरूर पोलिस ठाण्यात येथे फिर्यादी दिली. यामुळे शिरूर पोलिसांनी कुवर यांच्यावर पास्कोसह बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com