श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला अधिकाऱ्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला अधिकाऱ्यांची भेट
श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला अधिकाऱ्यांची भेट

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला अधिकाऱ्यांची भेट

sakal_logo
By

शिनोली, ता. १३ : भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी भाविकांना शिवलिंगाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनबारी, मंदिर ते वाहनतळ जाण्यासाठी भक्तभाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी पाहणी दरम्यान सांगितले आहे.

श्रावणी सोमवार यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच भीमाशंकर येथे भेट देऊन पाहणी केली. कोरोनामुळे दोन वर्षे दर्शनापासून वंचित असलेल्या भक्तांची यंदा गर्दी वाढणार असल्यानेचार वाहानतळात सुसज्ज पार्किंग व्यवस्था करावी, तसेच अधिकच पोलिस बंदोबस्तही वाढविण्याची गरज आहे. एक महिना लाइट जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी. मंदिरा जवळील स्वच्छता गृह चांगले ठेवावीत लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली पाहिजे.येथे दाट धुके व मोठा पाऊसही असणार आहे यामुळे भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना कोडोलकर यांनी यावेळी केले.

पाहणी दरम्यान तहसीलदार रमा जोशी, राजगुरुनगरचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग सुरेश पठाडे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, एसटी महामंडळ अधिकारी शिवकन्या थोरात, विद्युत महामंडळाचे उपअभियंता शैलेश गिते, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रेय हिले, ॲड. सुरेश कैदरे व विश्वस्त उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Shn22a00034 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..