मोफत पाठ्यपुस्तके ४ लाख विद्यार्थ्यांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत पाठ्यपुस्तके ४ लाख विद्यार्थ्यांना
मोफत पाठ्यपुस्तके ४ लाख विद्यार्थ्यांना

मोफत पाठ्यपुस्तके ४ लाख विद्यार्थ्यांना

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. ९ : ‘सारे शिकूया पुढे जाऊया’ असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील पहिले ते आठवीच्या शाळांमधील ४ लाख ९ हजार ४४७ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
संबंधित पाठ्यपुस्तकांचा जिल्हा कार्यालयाकडून तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुरवठा करण्यात येत आहे. तेथून शाळास्तरावर पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी शिक्षण विभागामार्फत नियोजन केले गेले. त्यानुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ४४७ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या ३ लाख ८७ हजार ९२६, हिंदी माध्यमाच्या १ हजार २९७, इंग्रजी माध्यमाच्या १५ हजार ७६६ व उर्दू माध्यमाच्या ४ हजार ३४८, तमीळ माध्यमाच्या ११० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके संख्या
पहिली- ४३ हजार ९९
दुसरी- ३९ हजार ४१२
तिसरी- ४३ हजार १५७
चौथी- ५० हजार ३५६
पाचवी- ५७ हजार ३८६
सहावी- ५५ हजार ९७१
सातवी- ५७ हजार ९६५
आठवी- ६२ हजार १०१

जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्यानुरूप कोणत्याही स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. नवगतांचे शिक्षणाच्या प्रवाहात वाजत गाजत स्वागत करण्यात येणार आहे.
- संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

बारामती तालुक्यासाठी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा यामधील विद्यार्थी संख्या प्रमाणे पाठ्यपुस्तके प्राप्त झाले आहेत. पाठ्यपुस्तके लवकरच शाळांपर्यंत वितरित करून शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन केले आहे.
- संपत गावडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, बारामती

मोफत पुस्तके पात्र विद्यार्थी संख्या
आंबेगाव- २०,३८८
खेड- ४४,२५७
जुन्नर- २८,०७६
मावळ- ३०,९७७
मुळशी- १८,१८५
भोर- १५,०६३
वेल्हे- ३,९४८
शिरूर, ४४,०९७
हवेली- ७०,७०३
पुरंदर- २१,०२८
दौंड- ३६,६५८
इंदापूर- ३९,४४१
बारामती ३६,६२६
एकूण ४ लाख ९ हजार ४४७

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00893 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top