फेरफार अदालतचे आज जिल्हाभरात आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरफार अदालतचे आज
जिल्हाभरात आयोजन
फेरफार अदालतचे आज जिल्हाभरात आयोजन

फेरफार अदालतचे आज जिल्हाभरात आयोजन

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. १० : पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत क्षेत्रीयस्तरावर बुधवारी (ता. ११) फेरफार अदालत आयोजित केली जाणार आहे. फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी त्यामध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून देऊन आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.
लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालत मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात ९ मेअखेर मुदत पूर्ण झालेल्या १४ हजार १३४ नोंदी प्रलंबित असून, या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत.
या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00895 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top