फेरफार अदालतीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरफार अदालतीला 
जिल्ह्यात मोठा प्रतिसाद
फेरफार अदालतीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

फेरफार अदालतीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. १२ : जिल्ह्यात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, एका दिवसात ४ हजार ५५२ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार ई-फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी (ता. ११) आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये साध्या ३ हजार ६८४, वारस नोंदी ६७६ आणि तक्रारी १९२, अशा एकूण ४ हजार ५५२ फेरफार नोंदी निर्गत केल्या.

बारामतीत सर्वाधिक फेरफार नोंदी
बारामती तालुक्यात सर्वाधिक ६६५, तर दौंड तालुक्यात ५९७ नोंदी निर्गत केल्या. हवेली तालुक्यात ३६८, पुणे शहरात ९, पिंपरी चिंचवडला १४८, शिरूरला ५९१, आंबेगावात ४२७, जुन्नरला २८१, इंदापुरात २१५, मावळमध्ये २४५, मुळशीत ८५, भोरला १२३, वेल्ह्यात १११, पुरंदरला २१८ आणि खेडमध्ये ४६९ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00896 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top