
ग्रामपंचायतींसाठी उद्या उद्या आरक्षण सोडत
शिर्सुफळ, ता. ४ : पुणे जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे ३०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सोमवारी (ता. ६) संबंधित ग्रामपंचायत कार्यालय होणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना केली होती. त्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार सोमवारी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रभाग रचना व आरक्षण सोडत रद्द झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती : वेल्हे- २८, भोर- ५६, दौंड- ८, पुरंदर- २, बारामती- १५, इंदापूर- ३०, जुन्नर- ५३, आंबेगाव- ३०, खेड- २८, शिरूर- १०, मावळ- १०, हवेली- १२, मुळशी- २१.
Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00901 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..