आपट्याच्या झाडावर कोसळली वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपट्याच्या झाडावर कोसळली वीज
आपट्याच्या झाडावर कोसळली वीज

आपट्याच्या झाडावर कोसळली वीज

sakal_logo
By

इंदापूर, ता.५ ः इंदापूर परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात सरडेवाडी- कांदलगाव रस्त्यावरील शहा नाला येथील मुख्य चौकात असणाऱ्या आपट्याच्या झाडावर वीज कोसळली. या झाडानजीक सिद्धू शिंगाडे यांची पानाची टपरी आहे. सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली त्यावेळी शिंगाडे आणि संतराम निकम हे टपरीत होते.या दरम्यान वीज कोसळल्याचा आवाज आला. यादरम्यान शिंगाडे व निकम यांच्या हाताला मुंग्या आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर दोघांनी बाहेर येऊन पाहिले असता शेजारील  आपट्याच्या झाडावर वीज कोसळून या झाडाच्या भल्या मोठ्या फांद्या वरुन खाली बुडापर्यंत दुभंगलेल्या त्यांना दिसून आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00932 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top