इंदापूरला अपघातग्रस्त वाहनात सापडला २८ किलो गांजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरला अपघातग्रस्त वाहनात सापडला २८ किलो गांजा
इंदापूरला अपघातग्रस्त वाहनात सापडला २८ किलो गांजा

इंदापूरला अपघातग्रस्त वाहनात सापडला २८ किलो गांजा

sakal_logo
By

इंदापूर, ता.६ ः इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे- सोलापूर महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या एका परप्रांतीय चारचाकी वाहनात तपासणी दरम्यान पोलिसांना तब्बल २८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे. पोलिसांच्या कारवाईत गाडीसह १८ लाख यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजस्थान पासिंग असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या अज्ञात मालक आणि चालका विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर शहरात मुक्कामी असताना सोमवारी पहाटे पालखी तळावर पेट्रोलिंग दरम्यान इंदापूर पोलिसांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडून चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर इंदापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चारचाकी वाहनाची पाहणी केली. या वाहनाच्या डिकीमधून उग्र वास आल्याने पोलिसांनी डिकीची तपासणी केली असता पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये २८.५ किलो गांजा आढळून आला. या घटनेत अपघातग्रस्त वाहनाचा चालक मात्र पोलिसांचे पथक घटनास्थळी येण्याआधीच फरार झाला होता. सदरची कारवाई इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, दाजी देठे, सहा फौजदार नितीन तांबे, चालक कदम, पोलिस नाईक चौधर, मोहिते, सलमान खान, मोहम्मद अली मडडी, पोलिस कर्मचारी शिंगाडे, विशाल चौधर, राखुंडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00937 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..