
पालखी सोहळ्यात सोन साखळ्यांची चोरी
इंदापूर, ता.६ ः इंदापूर येथील पालखी सोहळ्यात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एकाची, तर गोल रिंगण पाहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर आलेल्या एका भाविकाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली.
यामध्ये एकूण सव्वा चार तोळे वजनाच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शनिवारी (ता.२) घडलेल्या या घटनांसंदर्भात प्रकाश सूर्यभान धोरकट (रा. दत्तनगर, इंदापूर) आणि बबन ज्ञानदेव जगताप (रा.सरस्वतीनगर, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी (ता.२) पालखीचे आगमन इंदापूर शहराच्या हद्दीत होत असताना धोरकट कुटूंब तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी इंदापूर बारामती रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात (रोशनी हॉटेल) गेले होते. यावेळी दर्शनासाठी असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रकाश धोरकट यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्यांची सोन साखळी लंपास केली. रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात गोल रिंगण पाहण्यासाठी आलेल्या बबन ज्ञानदेव जगताप यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केली.
Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00938 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..