‘उजनी’च्या पाणी पातळीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उजनी’च्या पाणी पातळीत वाढ
‘उजनी’च्या पाणी पातळीत वाढ

‘उजनी’च्या पाणी पातळीत वाढ

sakal_logo
By

इंदापूर, ता. १२ ः पुण्यासह जिल्ह्याच्या इतर भागातही चांगलाच पाऊस आहे. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. तर या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. आत्तापर्यंत उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं होतं. मात्र, आज मंगळवार (ता. १२) रोजी रात्री उजनी धरण हे प्लसमध्ये येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
जून महिन्यात पावसानं ओढ दिली होती. मात्र, मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आंनदाचं वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने उजनी धरणात देखील ५ दिवसात उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. सध्याचा एकूण साठा ६३. ३८ टीएमसी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने हे धरण भरते. शेतकऱ्यांसाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्याच्या बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
पावसाची संततधार अशी लागून राहिली तर अगदी काही दिवसातचं उजनी शंभरी गाठू शकते. सध्या अति दाबाने भीमा नदी पात्रात पाणी येत असल्याने भीमा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उजनी धरणात बंडगार्डन मधून २५२१८ क्युसेक इतक्या दाबाने पाणी येत आहे.

सध्या असलेली उजनी धरणाची स्थिती
एकूण पाणीपातळी - ४९०.९९० मी.
एकूण पाणीसाठा - ६३.३८ टीएमसी

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00952 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..