उजनीत वाढला २६.७१ टीएमसी पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजनीत वाढला २६.७१ टीएमसी पाणीसाठा
उजनीत वाढला २६.७१ टीएमसी पाणीसाठा

उजनीत वाढला २६.७१ टीएमसी पाणीसाठा

sakal_logo
By

उजनी धरणाच्या साठ्यात वाढ

संततधार पावसामुळे आठ दिवसांत २६.७१ टीएमसी जमा

इंदापूर ता.१६ : पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास जीवनदायी असलेले उजनी धरणात सध्या झपाट्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसात उजनी धरण झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल २६.७१ टी एम सी एवढा मोठा पाणीसाठी वाढला आहे
या महिन्यातील मागील १ तारखेला उजनी धरणाचा पाणीसाठा हा मायनस होता. त्यावेळी धरणात ६०. ०५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता व धरण मायनस ६.७३ टक्के होते. मात्र पुणे जिल्ह्यातील धरण साखळीत गेल्या आठ दिवसात मोठा पाऊस झाल्याने या धरणातील पाणीसाठा सोडण्यात आला. भीमा नदीच्या मार्फत हा पाणीसाठा वाहत उजनी धरणात येतो. याच कारणाने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवार उजनी धरणात ८६.७६ टी एम सी एवढा पाणीसाठा झाला असून धरण ४३.११ टक्के एवढे भरले आहे.
चालु वर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासुनच दमदार पाऊस सुरु असल्यामुळे या भागांमध्ये आडसाली उस, केळी, पपई व द्राक्ष या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची खात्री झाल्यामुळे पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यंदा उजनी धरण जुलै महिन्यामध्येच प्लसमध्ये आल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची खात्री झाल्याने वेळीच पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात यावे व संभाव्य पूरस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उजनीच्या पाण्याची नियोजनाची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांतून होत आहे.
--
१७ जुलैचा सायंकाळी ६ वाजता उजनी धरणाची पाणीपातळी
एकूण पाणीपातळी - ४९३.९२०मीटर
एकूण पाणीसाठा - ८६.७६ टीएमसी
उपयुक्त साठा - २३.१० टीएमसी
टक्केवारी - ४३.११ टक्के
आवक
दौंड विसर्ग - ३२१११ क्यूसेक
01420

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00964 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..