कांदलगावला घरफोडीत ५० हजार रुपये लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदलगावला घरफोडीत
५० हजार रुपये लंपास
कांदलगावला घरफोडीत ५० हजार रुपये लंपास

कांदलगावला घरफोडीत ५० हजार रुपये लंपास

sakal_logo
By

इंदापूर, ता. २२ : कांदलगाव (ता. इंदापूर) येथे घरफोडीत ५० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली. एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रमोद तानाजी जगताप (रा. कांदलगाव) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जगताप हे आपल्या कुटुंबासमवेत १९ जुलै रोजी घराला कुलूप लावून बाहेर मुक्कामी गेले होते. दुसऱ्या दिवशी घराची पाहणी केली असता घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले, तर घरातील दोन लोखंडी कपाटाची दारेही उचकटून उघडलेली दिसली. त्यापैकी एका कपाटातील ५० हजार रोख रक्कम त्या ठिकाणी मिळून आली नाही. त्यानुसार त्यांनी आपली फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास इंदापूरचे पोलिस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार काशिनाथ नागराळे हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00976 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top