वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी
वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी

वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी

sakal_logo
By

इंदापूर ता.२५ : येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या परिसरात एक वानर मोकाट फिरत आहे. त्याची विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. नागरिकांतही भीतीच वातावरण पसरल्याने वन विभागाने त्वरित वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी विद्यार्थी पालकांमधून होत आहे.
इंदापूर शहरातही गेल्या अनेक दिवसांपासून हे वानर वावरत आहे. याकडे अनेक जण मनोरंजनातून पाहत आहेत. पण हेच वानर जेव्हा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी एकत्र असताना प्रवेश करते तेव्हा विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जाते. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश वेळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचीही मोठी तारांबळ उडते. मानवी वस्तीत मोकाट वावरणाऱ्या या वानराचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
वृक्षतोड होऊन जंगलाची संख्या कमी होत असल्याने वन्य प्राण्यांचा मानवाच्या काँक्रेट जंगलामध्ये वावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मग तो बिबट्या असो रानगवा, रानरेडे किंवा वानर असो. हे सध्या मानवी वस्तीत शिरकाव करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.


01451

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00980 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..