इंदापूरमध्ये शिवसेना जिल्हा समन्वयकावर विनयभंगाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरमध्ये शिवसेना जिल्हा समन्वयकावर विनयभंगाचा गुन्हा
इंदापूरमध्ये शिवसेना जिल्हा समन्वयकावर विनयभंगाचा गुन्हा

इंदापूरमध्ये शिवसेना जिल्हा समन्वयकावर विनयभंगाचा गुन्हा

sakal_logo
By

इंदापूर, ता. २४ : इंदापूर येथील शिवसेना जिल्हा समन्वयक यांच्यावर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार १४ जुलै रोजी इंदापूर येथील पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाल्यानंतर फोटो काढत असताना शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे (रा. इंदापूर) यांनी डाव्या खांद्यावर हात टाकीत, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार रविवार (ता. २३) रोजी इंदापूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळून लावला असून पक्षातील अंतर्गत गटबाजीतून हे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00984 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..