इंदापुरात विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
इंदापुरात विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

इंदापुरात विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

sakal_logo
By

इंदापूर ता.२६ : येथील एस.बी.पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठीची निवडणूक प्रक्रिया चुरशीच्या वातावरणात पार पडली. यामुळे विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया अनुभवली.

एस.बी.पाटील इंटरनॅशनल स्कूल व एस.बी.पाटील पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेंमधून एक ''विद्यार्थिनी प्रतिनिधी'' व एक ''विद्यार्थी प्रतिनिधी''साठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दोन्ही शाळांमधून एकूण दहा उमेदवार उभे होते. त्यांच्यासाठी दोन्ही शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून मतदान केले. या निवणुकीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मुलांमधून दहावीतील श्रीतेज सचिन सरडे याला २०६ तर मुलींमधून सृष्टी सुभाष भिसे हिला १८९ मते मिळाली.

राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे विषय शिकत असताना निवडणूक प्रक्रिया कशी असते, हे ज्ञान आपण विद्यार्थ्यांना देत असतो. परंतु प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षणाद्वारे मतदान प्रक्रिया समजावी यासाठी ही निवडणूक शाळेत राबवल्याचे शाळेचे प्राचार्य शैलेश दरेकर यांनी सांगितले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मनीषा सूर्यवंशी व अतुल सुर्वे यांनी काम पाहिले. सर्व मतदारांनी आधारकार्ड दाखवल्यानंतर त्यांना डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यात आली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट्सची निर्मिती केली होती. या उपक्रमामध्ये शिक्षक नंदा शिंदे, जुलेखा मुलानी, सुवर्णा शिंदे, सुरज लेंडे,नीता नलवडे, कला शिक्षक उमेश लटके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

01465

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00987 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top