इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत संपन्न
इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत संपन्न

इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत संपन्न

sakal_logo
By

इंदापुरात मात्तबरांच्या तयारीवर पाणी
इंदापूर, ता. २८ : इंदापूर पंचायत समितीच्या १८ जागांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८) इंदापूर पंचायत समितीच्या शंकरराव पाटील सभागृहात काढण्यात आली. यामध्ये आरक्षणामुळे काही मात्तबरांच्या तयारीवर पाणी फिरले, तर काही ठिकाणच्या नेत्यांना लॉटरी लागली. अनेक प्रस्थापितांना धक्के बसले, तर नव्यांना पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’चे चित्र पाहायला मिळाले.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना केली. त्यानुसार इंदापूर जिल्हा परिषदेचे पूर्वीचे ७ गट होते. त्यामध्ये दोनने वाढ होऊन ९ झाले, तर पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये ४ गणांची वाढ होऊन १८ गण झाले. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली.
उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या उपस्थित श्री. नारायणदास रामदास हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील प्रतीक विठ्ठल म्हेत्रे या विद्यार्थ्याच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली.

गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
१) भिगवन- सर्वसाधारण महिला
२) शेटफळगढे- सर्वसाधारण महिला
३) अंथुर्णे- सर्वसाधारण
४) बोरी- सर्वसाधारण महिला
५) पळसदेव- सर्वसाधारण
६) बिजवडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
७) निमगाव केतकी- सर्वसाधारण
८) शेळगाव- सर्वसाधारण
९) वडापुरी- सर्वसाधारण महिला
१०) माळवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
११) सणसर- नागरिकांचा मागास प्रवर्ग
१२) बेलवाडी- सर्वसाधारण
१३) लासुर्णे- सर्वसाधारण
१४) वालचंदनगर- अनुसूचित जाती महिला
१५) काटी- नागरिकांचा मागासवर्ग
१६) वरकुटे- सर्वसाधारण महिला
१७) बावडा- अनुसूचित जाती जमाती महिला
१८) लुमेवाडी - अनुसूचित जाती

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00996 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..