
इंदापूर येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानास सुरुवात
इंदापूर, ता. ६ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढायांची स्मृती कायम राहावी, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच देशभक्तीच्या भावना कायमस्वरूपी जनमानसात रुजावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.
इंदापूर पंचायत समिती येथे ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचा शुभारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे, विस्तार अधिकारी सचिन धापटे, शहा गावचे उपसरपंच दिलीप पाटील, तानाजीराव धोत्रे, बाबर पाटील उपस्थित होते.
तर गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाविषयी माहिती दिली. या उपक्रमात इंदापूर तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग घेतला जाणार आहे. तसेच लोकसहभाग वाढवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01026 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..