भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात
भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

sakal_logo
By

इंदापूर, ता. १६ : इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्य. आश्रमशाळा व मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ध्वजावंदन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे, संचालक राहुल सवणे, गोरख तिकोटे, संजय कांबळे, सेवानिवृत्त सैनिक मधुकर जगताप, शिवाजी चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, गोरख चौगुले, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे आदी उपस्थित होते. नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले. तर हिरालाल चंदनशिवे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01078 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..