मोफत एसटी बस प्रवासांमुळे इंदापुरात ज्येष्ठ नागरिक सुखावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत एसटी बस प्रवासांमुळे इंदापुरात ज्येष्ठ नागरिक सुखावले
मोफत एसटी बस प्रवासांमुळे इंदापुरात ज्येष्ठ नागरिक सुखावले

मोफत एसटी बस प्रवासांमुळे इंदापुरात ज्येष्ठ नागरिक सुखावले

sakal_logo
By

इंदापूर, ता.२७ : नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त ज्या नागरिकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केले आहेत. त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची योजना जाहीर केली होती. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता.२६) करण्यात आली. इंदापूर आगारात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
योजनेच्या प्रारंभानिमित्त इंदापूर आगार प्रमुख मेहबूब मणेर यांच्या हस्ते लाभार्थी ज्येष्ठांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. प्रमुख आगारातून दुपारीपर्यंत जवळपास २५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यामध्ये दुपारनंतर वाढ झाली. दररोज ७० ते ८० ज्येष्ठ नागरिक या सुविधांचा लाभ घेतील, असे आगार प्रमुख मणेर यांनी सांगितले. दरम्यान, ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना पूर्वीप्रमाणे ५० टक्के योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सदर योजना ही अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या नावाने संबोधण्यात येईल . सदरची सवलत महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत लागू आहे.
--
01764

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01126 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..