पत्नीसह सासरच्यांवर कोयत्याने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीसह सासरच्यांवर कोयत्याने हल्ला
पत्नीसह सासरच्यांवर कोयत्याने हल्ला

पत्नीसह सासरच्यांवर कोयत्याने हल्ला

sakal_logo
By

इंदापूर, ता. २७ : पळसदेव (ता. इंदापूर) येथे पतीने ऊस तोडण्याच्या कोयत्याने पत्नीवर वार केला. तसेच, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सासरवाडीच्या मंडळींवरही त्याने हल्ला चढवला.
याप्रकरणी जनार्दन गोविंद गाडे (रा. न्हावरे, ता. शिरूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याची पत्नी माहेरी पळसदेव येथे आलेली आहे. त्यामुळे त्याने शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास पळसदेव येथे सासरी येऊन पत्नीला शिवीगाळ करत, ‘तू माझ्या सोबत नांदायला का येत नाही? तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत हातातील उस तोडण्याच्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर वार केला. त्यामुळे ती कोसळली. त्यावेळी तिचा भाऊ शुभम शिवाजी शेलार (वय २३, रा. पळसदेव) याने आरोपीच्या हातातून कोयता घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर व उजवे हातावर वार केला. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्याचे वडील व गाडे याचे सासरे मुलाला सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्याही डाव्या हाताच्या तळव्यावर व उजव्या हाताचे मनगटाचे व बोटांमध्ये वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. त्यांना लाथांनी मारहाण केली. तसेच, सासूच्या पाठीत कोयता उलटा मारून त्यांनाही दुखापत केली आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सासरच्या सर्वांना, ‘तुम्ही सर्वजण आता माझ्या तावडीतून वाचला आहे. परंतु, पुढे माझ्या तावडीतून वाचणार नाही,’ अशी धमकी देऊन तो पळून गेला.
याबाबत शुभम याने फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश माने हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01128 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..