वरकुटे बुद्रुक दरोड्यातील ३ कोटी ४४ लाख हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरकुटे बुद्रुक दरोड्यातील
३ कोटी ४४ लाख हस्तगत
वरकुटे बुद्रुक दरोड्यातील ३ कोटी ४४ लाख हस्तगत

वरकुटे बुद्रुक दरोड्यातील ३ कोटी ४४ लाख हस्तगत

sakal_logo
By

इंदापूर, ता.२ : वरकुटे बुद्रुक पाटीजवळ (ता. इंदापूर) मोटारीवर गोळीबार करत ३ कोटी ६० लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीकडून ३ कोटी ४४ लाख ३० हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ७२ तासांत तपास लावत एवढी मोठी रक्कम आरोपीकडून हस्तगत केल्याने पोलिस कामकाजाचे कौतुक होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांनी ७२ तासांत तपास करीत पहिल्यांदा ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये जप्त केले होते. उर्वरित आरोपी व रक्कम मिळवणे पोलिस प्रशासनापुढे आव्हान होते. राजस्थानमध्ये पळालेल्या ३ आरोपी पकडण्यात यश मिळाले. यामध्ये गौतम अजित भोसले (वय ३३, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडून ७१ लाख ६० हजार, किरण सुभाष घाडगे (वय २६, रा. लोणी देवकर, ता. इंदापूर) याच्याकडून ६० लाख रुपये व भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय २५, रा. लोणी देवकर, ता. इंदापूर) याच्याकडून ६९ लाख ५० हजार रुपये, असे २ कोटी १ लाख १० हजार व पाहिले १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये, असे एकूण ३ कोटी ४४ लाख ३० हजार रुपये हस्तगत केले.
राजस्थान येथून अटक केलेल्या तीन आरोपींना इंदापूर न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01163 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..