इंदापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
इंदापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

इंदापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

sakal_logo
By

इंदापूर, ता. ६ : इंदापूर पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर १ व २ मधील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प इंदापूर अंतर्गत गेले अनेक वर्ष अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांचे काम शासन आदेशानुसार नियमितपणे व वेळोवेळी त्यांना करावे लागते. असे असताना त्यांचे आपल्या स्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रक्षिक्षण भत्ता देण्यात आलेला नाही, तो तातडीने देण्यात यावा, अंगणवाडी कामकाजासाठी ग्रामपंचायत स्तरावरील रजिस्टर उपलब्ध व्हावे, ५ वर्ष पूर्ण केलेल्या पर्यवेक्षकांची बीट अंतर्गत बदली व्हावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य काम देण्यात येवू नये, इतर राज्य सरकार प्रमाणे मानधन देण्यात यावे. दरमहा पेन्शन योजना लागू करण्यात यावे, रिक्त जागा तातडीने भरण्यात. आजारपणाची रजा देण्यात यावी, इंदापूर प्रकल्प २ चे भिगवणचे कार्यालय पंचायत समिती इंदापूर येथे स्थलांतरित करण्यात यावे, मोडकळीस आलेल्या अंगणवाडी केंद्रांना दुरुस्तीचे खर्च देण्यात यावेत यासह अन्य मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष नीलेश दातखिळे, जिल्हा उपाध्यक्ष पुनम निबांळकर यांच्यानेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

01854

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01173 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..