''द्राक्ष संशोधन''च्या मशागत पद्धतीचा अवलंब करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''द्राक्ष संशोधन''च्या मशागत पद्धतीचा अवलंब करा
''द्राक्ष संशोधन''च्या मशागत पद्धतीचा अवलंब करा

''द्राक्ष संशोधन''च्या मशागत पद्धतीचा अवलंब करा

sakal_logo
By

इंदापूर, ता.१० : "राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास द्राक्ष शेती फायद्याची होऊ शकते," असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी.सोमकुवर यांनी केले.
इंदापूर येथे आयोजित द्राक्ष शेती व्यवस्थापन चर्चासत्रामध्ये ते नुकतेच बोलत होते. डॉ. सोमकुवर पुढे म्हणाले, "द्राक्ष शेती प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असल्याने बागायतदारांना सातत्याने हवामान बदलाला सामोरे जावे लागते. बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे द्राक्षमालाच्या प्रतिवर मोठा परिणाम जाणवत आहे. देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी उच्च प्रतीची द्राक्ष तयार करावी लागणार आहे, त्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र संशोधन करीत असून शेतकरी बांधवांनी शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे केंद्राने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा"

द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी उत्कृष्ट चवीची द्राक्ष तयार करण्यासाठी कमीत कमी संजीवकांचा वापर करण्याचे सुचविले. द्राक्ष रोग व्यवस्थापनाबाबत डॉ. सुजय सहा यांनी मार्गदर्शन केले. फार्म लॅब पुणेचे संचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी द्राक्ष वेलींची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जैविक निविष्ठा वापरण्याचे सांगितले.

चर्चासत्रास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, डॉ. युक्ती वर्मा, कीटक शास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव, श्रीमंत ढोले, डॉ. वसंत दगडे, सतीश महानवर, विलास बोराटे, द्राक्ष बागायतदार अशोक पाटील, संतोष जाधव, सचिन तरंगे, तुकाराम करे, संपत बुटे, विष्णू हरणावळ, तुषार बुटे विजय जगताप, सतीश क्षीरसागर यांचेसह द्राक्ष बागायतदार उपस्थित होते. राजेंद्र वाघमोडे यांनी प्रास्तावित तर सुधीर वाघमोडे यांनी आभार मानले.

01877

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01185 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..