बावड्यात दरोडेखोरांची कुटुंबाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावड्यात दरोडेखोरांची कुटुंबाला मारहाण
बावड्यात दरोडेखोरांची कुटुंबाला मारहाण

बावड्यात दरोडेखोरांची कुटुंबाला मारहाण

sakal_logo
By

इंदापूर, ता. १५ : बावडा-काकडेवस्ती (ता. इंदापूर) येथे चार चोरट्यांनी दरोडा टाकत १ लाख ११ हजार रुपयांचे ऐवज लुटून नेला. यावेळी संबंधित कुटुंबाला बेदम मारहाणही करण्यात आली.
याबाबत अनिता अंकुश काकडे (वय ३५, रा. काकडेवस्ती) यांनी इंदापूर पोलिस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. १५) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कोणीतरी जोराचा धक्का दिला. त्यामुळे दरवाजाला आतून असलेली कडी तुटली व दरवाजा उघडला गेला. त्यावेळी चार अनोळखी चोरटे घरामध्ये शिरले. तेव्हा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता एकाने अनिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तोडून घेतले व त्यांना हाताने मारहाण केली, तर एकजण घरामधील कपाटाचे जवळ जाऊन त्याने कपाट उघडून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील दागिने काढून घेतले. तर, बाहेर थांबलेल्या दोघांनी अनिता यांच्या पतीला मारहाण करत त्यांना घरामध्ये घेवुन आले. या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून अनिता यांच्या कानातील फुले व त्यांच्या मुलीच्या कानातील रिंगा काढून घेतल्या. ‘तुम्ही कोणाला सांगितल्यास अथवा आरडाओरडा केल्यास तुम्हाला सर्वांना जिवे मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर काकडे कुटुंबातील चौघांना घरात कोंडून बाहेरून कडी लावून दरोडेखोर पसार झाले.
या गुन्ह्याचा तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि सहा पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01207 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..