Pune : ‘लम्पी’बाबत योग्य ती खबरदारी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatray Bharane
‘लम्पी’बाबत योग्य ती खबरदारी घ्या

Pune : ‘लम्पी’बाबत योग्य ती खबरदारी घ्या

इंदापूर : पशुवैद्यकीय प्रशासनाने जनावरांमध्ये उद्‍भवलेल्या लम्पी आजाराबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना माजी पशुसंवर्धन राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी प्रशासनाला केली.

इंदापूर तालुक्यामध्ये गाय वर्ग व म्हैस वर्ग जनावरांची संख्या जवळपास १ लाख ७० हजार ४६५ इतकी आहे. तालुक्यामध्ये लम्पीचा आजार आल्याने आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत लम्पीच्या ९९ केसेस आढळलेल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५१ केसेस या पूर्णपणे ठिक झालेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये ४३ केसेस ऍक्टिव्ह आहेत. आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या मध्ये मोठ्या मृत जनावरांना ३५ हजार रुपये इतके तर लहान जनावरांना १६ हजार रुपये रक्कम शासनामार्फत नुकसान भरपाई म्हणून देणार आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.

या आजाराबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरू नये तसेच आजाराबाबतची योग्य खबरदारी माहिती तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन भेट द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आली. आतापर्यंत तालुक्यामध्ये २७ दवाखान्यांमार्फत काम चालू आहे.
आजपर्यंत ४० हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते. त्याचेही लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनाही सूचना करून जिल्हा परिषदेच्या वतीने ५० हजार लसींचे डोस देण्याची व्यवस्था होईल, असे भरणे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने शहाजीनगर भागात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळला आहे. याठिकाणी जवळपास २१ जनावरे लम्पी आजाराने बाधित झालेली आहेत. याचबरोबर कळस, कळंब, लासुर्णे, उद्धट, कुंभारगाव, डाळज, भिगवण, निरगुडे, सणसर या गावांमध्ये लम्पी आजार झालेली जनावरे आढळून आली आहेत. या भागातील पशुपालकांनी जनावरांच्या अंगावर पुरळ येणे, ताप येणे, नाकातून स्त्राव येणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन आमदार भरणे यांनी केले. याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01215 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..