पंधरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : पाटील
पंधरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : पाटील

पंधरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : पाटील

sakal_logo
By

इंदापूर, ता.२७ : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ च्या ३३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारखान्याचे ज्येष्ठ सभासद कुबेर पवार व त्यांच्या पत्नी कारखान्याच्या संचालिका शारदा या दाम्पत्याच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले, की गाळप हंगामामध्ये ३८ हजार एकर नोंदीचा व बिगरनोंद पाच हजार एकर असा एकूण ४१ हजार एकर ऊस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे. यामधून अंदाजे १६ ते १७ लाख टन ऊस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे. गाळप येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी प्रास्ताविकामध्ये येत्या हंगामाच्या पूर्वतयारी बाबत सर्व माहिती दिली. कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक शारदा पवार, पराग जाधव, छगन भोंगळे, वसंत मोहोळकर, रतन देवकर, हनुमंत जाधव, भूषण काळे, विश्वास देवकाते, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर, प्रदिप पाटील, शांतिलाल शिंदे, निवृत्ती गायकवाड, सतीश व्यवहारे, अशोक कदम, प्रवीण देवकर, माजी अध्यक्ष माऊली बनकर, माजी संचालक सुभाष काळे, मानसिंग जगताप, शरद काळे, अभंग अण्णा, पांडुरंग गलांडे, विविध संस्थांचे पदाधिकारी भाउसाहेब चोरमले, सुभाष बोंगाणे, महेंद्र रेडके, गोरख शिंदे, राघू काटे, पिंटू काळे, बळीकाका बोंगाणे, बजरंग करे, संजय देहाडे यांचेसह आजी माजी पदाधिकारी सभासद, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मागील वर्षी कारखान्याचे साखर उतऱ्यानुसार २४५० रुपये टन एफआरपी बसत असताना २५०० रुपये प्रतीटन भाव देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे.
- हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना

01992