जिल्हा बँकेतर्फे विठाबाई सोसायटीला दुसऱ्यांदा ढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँकेतर्फे विठाबाई सोसायटीला दुसऱ्यांदा ढाल
जिल्हा बँकेतर्फे विठाबाई सोसायटीला दुसऱ्यांदा ढाल

जिल्हा बँकेतर्फे विठाबाई सोसायटीला दुसऱ्यांदा ढाल

sakal_logo
By

इंदापूर, ता. ४ : गंगावळण (ता. इंदापूर) येथील विठाबाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उल्लेखनीय कामकाज, उच्चांकी व विशेष प्रगतीमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे, अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा मानाची ढाल बक्षीस देण्यात आली.
विठाबाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगावळण या संस्थेची स्थापना १९२४ मध्ये झाली. ही संस्था काही वर्षानंतर लिक्विडेशनमध्ये गेली. त्यानंतर इंदापूर तालुक्याला सहायक निबंधक म्हणून मच्छिंद्र पाटील आले. त्यांनी १९८१ मध्ये या संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संस्थेमध्ये आर्थिक तफावत पडल्याने कर्ज वाटप होत नसत. त्यासाठी कै. शंकरराव पाटील यांनी बँकेचे तत्कालीन चेअरमन यांना वेळोवेळी सांगून कर्ज वाटप देण्यास लावले व ही संस्था प्रगतीपथावर गेली. यामधून केलेले प्रगतीपोटी २००७ साली प्रथम संस्थेला मानाची ढाल बक्षीस मिळाली होती व त्यानंतर २०११ मध्ये परत या संस्थेला प्रगतीपथावर गेल्यामुळे ढाल बक्षीस मिळाली. या चालू वर्षी संस्थेने दहा टक्के डिव्हिडंट काढला. यासाठी बँकेचे अधिकारी पोरे साहेब यांचे संस्थेला खूप सहकार्य लाभले.
संस्थेचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, अध्यक्ष नीलेश कन्हेरे, माजी अध्यक्ष गोरख बोंगाणे, कालिदास देवकर, अमोल भिसे, किसन जावळे, छगन तांबिले, बाळासाहेब व्यवहारे तसेच आजी - माजी सर्व संचालक आंदीनी मानाची ढाल स्वीकारली.


संस्थेला बक्षीस म्हणून ढाल देत असताना रोख स्वरूपात १ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात यावे. त्यामुळे वसुलीसाठी स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा संस्थेला आणि बँकेला होईल.
- महारुद्र पाटील, माजी इंदापूर तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी

02051