झेडपीकडून शिक्षकांच्या पगाराची रक्कम थेट खात्यावर जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीकडून शिक्षकांच्या पगाराची रक्कम थेट खात्यावर जमा
झेडपीकडून शिक्षकांच्या पगाराची रक्कम थेट खात्यावर जमा

झेडपीकडून शिक्षकांच्या पगाराची रक्कम थेट खात्यावर जमा

sakal_logo
By

इंदापूर, ता. ४ ः पुणे जिल्हा परिषदेच्या साडेअकरा हजार शिक्षकांचे ऑगस्ट २०२२ या महिन्याची CMP (कॅश मॅनेजमेंट प्रणाली) प्रणालीद्वारे वेतनाची रक्कम थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद स्तरावरून हस्तांतरित करण्यात आली. यामुळे दसरा सणाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन यशस्वीपणे एकाचवेळी शिक्षकांच्या खात्यात जमा झाल्याने जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक कामगिरीचे जिल्ह्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
पुणे जिल्हा परिषद अशा प्रकारे वेतन रक्कम हस्तांतरित करणारी राज्यातील सर्वात मोठी पहिली जिल्हा परिषद असून इतक्या मोठ्या संख्येतील शिक्षकांचे व एकाच वेळी एवढ्या मोठ्या रकमेचे झेडपीएफएमएस CMP प्रणालीद्वारे हस्तांतरण करणारी व पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करणारी राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. या प्रणालीमुळे दसरा सणाच्या पूर्वसंध्येला वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा झाल्याने सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले व जिल्हा परिषदेचे आभार मानले.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तसेच झेडपीएफएमएस प्रणालीतील सर्व सहभागी टीम यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वेतन करण्याच्या दृष्टीने प्रथमच झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे वेतन करण्याची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे यापुढे वेतन वेळेवर व दरमहा एक तारखेलाच जमा केले जाईल, असा विश्वास आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. यासाठी शिक्षण विभागातील हनुमंत कोलगे अधीक्षक, विशाल शेलार, कनिष्ठ लेखा अधिकारी प्रयास वाळद्रा, तालुका स्तरावरील सर्व सहाय्यक लेखा अधिकारी, जिल्हा समन्वयक सुनील मिडगुले, वसंत फलफले यांच्यासह सर्व तालुक्यातील तालुका शालार्थ समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. वित्त विभागातील महेश अवताडे, अभिजित पाटील, रणजित कदम, ज्ञानेश्वर पारधी, गुलचंद गायकवाड, सुनील जाधव, संदीप शिंदे रोखपाल, एकता वाडेकर, मानसी घाग, तौफीक मोमीन यांचे सहकार्य लाभले.