इंदापूरमध्ये रंगोली इव्हेंट्सच्या माध्यमातून नवदुर्गाचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरमध्ये रंगोली इव्हेंट्सच्या माध्यमातून नवदुर्गाचा सन्मान
इंदापूरमध्ये रंगोली इव्हेंट्सच्या माध्यमातून नवदुर्गाचा सन्मान

इंदापूरमध्ये रंगोली इव्हेंट्सच्या माध्यमातून नवदुर्गाचा सन्मान

sakal_logo
By

इंदापूर ता. ६ : नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२२ आयोजित रंगोली इव्हेंट्सच्यावतीने इंदापूर शहरातील व तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक पोपट शिंदे यांच्या माध्यमातून नवरात्री महोत्सवानिमित्त महिलांसाठी तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते व कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शोभा भरणे, पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या तीन दिवसात अभिनेते प्रसाद सुर्वे, अभिनेत्री अस्मिता देशमुख, ऋषी काळे या कलाकारांसह रायझिंग स्टार नृत्य अकादमीचे प्रमुख अनिकेत गायकवाड, अंकिता गायकवाड, आशिष वानखेडे आदी कलाकारांनी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पोपट शिंदे, राहुल गुंडेकर, शोएब बागवान, रमेश शिंदे यांनी प्रयत्न केले.