इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ इंदापूर ः पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ केल्याचे जाहीर करताना पदाधिकारी व संचालक मंडळ. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ 
इंदापूर ः पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ केल्याचे जाहीर करताना पदाधिकारी व संचालक मंडळ.
इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ इंदापूर ः पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ केल्याचे जाहीर करताना पदाधिकारी व संचालक मंडळ.

इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ इंदापूर ः पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत वाढ केल्याचे जाहीर करताना पदाधिकारी व संचालक मंडळ.

sakal_logo
By

विजयदशमीच्या मुहूर्तावर ३० लाखांच्या वाटपास संचालक मंडळाची मंजुरी
इंदापूर ता. ९ ः इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ९९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेत कर्जमर्यादेत वाढ करीत ३० लाख रुपये कर्ज वाटपास विजयादशमीच्या मुहूर्तावर मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आदिनाथ धायगुडे, उपाध्यक्ष रामचंद्र शिंदे व सचिव प्रशांत भिसे यांनी दिली.

सर्वात कमी ९ टक्के व्याजदराने ३० लाख रुपये कर्ज देणारी अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाईल, असा विश्वास यावेळी शिक्षक स्वाभिमानी परिवाराचे नानासाहेब नरुटे, सहदेव शिंदे, सतिश शिंदे, सुहास मोरे यांनी व्यक्त केला.

सभासदांची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन तातडीची कर्जमर्यादा ७५ हजार करण्यात आली. यासह दुर्दैवाने एखादा सभासद मयत झाल्यास त्यांच्या वारसास शिक्षक कल्याण निधीमधून २० लाख व विम्यातून १० लाख आणि अंशदायी पेन्शनधारक सभासदांना शिक्षक कल्याण निधीमधून ३१ लाख रुपये व विम्यामधुन १० लाख अशी ४१ लाखांची मदत जाहीर केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी दत्तात्रेय तोरसकर, सुरेश पांढरे, उद्धव गरगडे, कैलास वणवे, दत्तात्रेय ठोंबरे, बालाजी कलवले, दत्तात्रेय चव्हाण, सतिश गावडे, सतिश दराडे, अनिल शिंदे, किशोर वाघ, भाऊसाहेब वनवे, सचिन देवडे, संजय म्हस्के, शशिकांत शेंडे, प्रशांत घुले, संतोष तरंगे, भारत बांडे, सदाशिव रणदिवे, संगिता पांढरे आदी उपस्थित होते.
------