जानाई देवीच्या यात्रेस कटफळमध्ये सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जानाई देवीच्या यात्रेस
कटफळमध्ये सुरुवात
जानाई देवीच्या यात्रेस कटफळमध्ये सुरुवात

जानाई देवीच्या यात्रेस कटफळमध्ये सुरुवात

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. ६ : बारामती तालुक्यातील कटफळ येथील श्री जानाई देवीची परंपरेप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (ता. ६) घटस्थापना करण्यात आली. यानिमित्ताने येथील यात्रेस देखील सुरुवात झाल्याची माहिती सरपंच पूनम कांबळे व देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या वतीने देण्यात आली.

कटफळ येथील श्री क्षेत्र जानाई देवीच्या यात्रेचा रविवारी (ता. ९) मुख्य दिवस आहे. त्या दिवशी देवीच्या आरत्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पंचक्रोशीतील शेटफळ, शिर्सुफळ, पारवडी, गोजुबावी, शिरवली, पेडगाव, तांदूळवाडी आदी गावांच्या छबिन्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. १०) पहाटे भाकणूक होणार आहे. साहेबराव नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशाचेही नियोजन करण्यात आले आहे.
-----------------