कालठण, गलांडवाडी केंद्राच्या शिक्षकांमुळे साडेचारशे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालठण, गलांडवाडी केंद्राच्या शिक्षकांमुळे साडेचारशे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड
कालठण, गलांडवाडी केंद्राच्या शिक्षकांमुळे साडेचारशे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड

कालठण, गलांडवाडी केंद्राच्या शिक्षकांमुळे साडेचारशे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड

sakal_logo
By

इंदापूर, ता.२५ : ऊस तोडणी व्यवसायामुळे आपल्या घरापासून दूर असलेल्या ऊसतोड मजुरांची दिवाळी अंधकारमयच असते. यामुळे कालठण व गलांडवाडी केंद्रातील (ता. इंदापूर) प्राथमिक शिक्षकांनी मजुरांची दिवाळी गोड होण्यासाठी त्यांना फराळ वाटपाचा उपक्रम राबविला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या शिक्षक बांधवांनी एकत्र येत स्वतः तसेच इतर शिक्षक वृंद व मित्रमंडळी यांचे सहकार्यातून साखर कारखाना व इतर ठिकाणी उतरलेल्या जवळपास ४५० पेक्षा जास्त ऊसतोड कुटुंबाना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी राजवडी, काळेलवाडी, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हमाल चाळ, ऊसतोड कामगारांची पाले व प्रत्यक्ष बांधावर जाऊन गरीब व मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना फराळाचे वाटप केले.
यामध्ये सहशिक्षक जमीर शेख, वसंतराव फलफले, भालचंद्र भोसले, सुधाकर गडशिंग, अमोल बोराटे, प्रवीण ढुके, तुकाराम बुटे, नितिन भोसले, रवींद्रकुमार तनपुरे या शिक्षक बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.
-
02191