इंदापूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांचा आज भाजपप्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष
सावंत यांचा आज भाजपप्रवेश
इंदापूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांचा आज भाजपप्रवेश

इंदापूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांचा आज भाजपप्रवेश

sakal_logo
By

इंदापूर, ता. २५ : इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत बुधवारी (ता. २६) कार्यकर्त्यांसमवेत हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सावंत म्हणाले, ‘‘विकासकामांसंदर्भात तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे दुजाभाव करत आहेत. अनेक वेळा महाविकास आघाडीतील एक घटक म्हणून स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी याबाबत वारंवार चर्चा करून पाठपुरावा केला, मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. शहरातील श्रीराम सोसायटी येथील रस्त्याच्या कामाचा निधी इतर ठिकाणी वळवला. याबाबत सोसायटीची सभा झाली. सोसायटीतील सभासदांनी ही बाब माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कळविले. त्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून कामांना निधी दिला जाईल, असे आश्वासित केले. त्यामुळे इथून पुढील काळात हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.’’
यावेळी भाजपचे युवा नेते राजवर्धन पाटील, मयूर पाटील, संदीपान कडवळे, शहराध्यक्ष शकील सय्यद, सागर गानबोटे आदी उपस्थित होते.