इंदापूरमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरमध्ये कत्तलीसाठी नेण्यात 
येणाऱ्या जनावरांची सुटका
इंदापूरमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका

इंदापूरमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका

sakal_logo
By

इंदापूर, ता. २९ ः इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळी केलेल्या कारवाईत ५ जनावरांसह पिकअप टेम्पो असा एकूण ४ लाख ३२ हजाराचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे अक्षय राजेंद्र कांचन (वय २५ वर्षे, रा. उरुळी कांचन ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत मोसिन शौकत कुरेशी (रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद) व शमशुद्दीन सय्यद (रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २९) दुपारी अडीचच्या दरम्यान पुणे- सोलापूर मार्गावर पळसदेव गावच्या हद्दीत संशयित पिकअप गाडी सोलापूर बाजूकडे जात असताना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गाडीमध्ये २ देशी गायी, १ वासरू, १ गीर गाय व त्याचे १ कालवड अशी ५ जनावरे दाटीवाटीने बांधून नेण्यात येत होती. पिकअप चालकाकडे अधिक चौकशी केली असता जनावरे इंदापूर येथे कत्तल करण्यासाठी घेवुन जात असल्याचे समजले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुरेंद्र वाघ करत आहेत.