बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल
बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल

बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल

sakal_logo
By

इंदापूर, ता. ५ : ''''माझ्यासह हर्षवर्धन पाटील, भीमराव तापकीर, राहुल कुल, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून सेना भाजपचीही शक्ती तयार झाली आहे. यातूनच आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल,'''' असा विश्वास माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांच्या बाळासाहेब शिवसेनेच्या पक्ष विस्तार वाढीसाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या आढावा बैठकीप्रसंगी शिवतारे बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, ज्यांच्याशी आम्ही लढलो त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आणि सरकार असतानाही सेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. सेनेचे खच्चीकरण करण्यात आले आणि सेना संपवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने केले आहे. बाळासाहेबांचे बंगले इमारती यांचे वारस उद्धव ठाकरे असतील पण बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस हे एकनाथ शिंदे व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत असे प्रतिपादन यांनी यावेळी केले.
यावेळी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सुदर्शन साखरे, अशोक देवकर, भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे, सुरेंद्र जेवरे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे सरकार अजून राहिले असते तर सेनेसह लोकांचेही वाटोळे झाले असते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती करीत भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यात आले आणि हे सरकार आता सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणून काम करत आहे आणि पुढचा काळ हा सेना-भाजपसाठी उज्ज्वल असेल.
- विजय शिवतारे, माजी मंत्री

शिवसैनिक गुंडच पण जनतेच्या हितासाठी..
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शिवसैनिक गुंडच आहे पण जनतेच्या हितासाठी याची आठवण करून देत विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले.

03092