शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच
शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच

शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच

sakal_logo
By

शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच
शासनआदेश राहिला कागदावरच; पुणे जिल्ह्यासह राज्यात शिक्षकांची नाराजी
इंदापूर, ता. ६ ः दिवाळीपूर्वीच राज्यातील शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, मात्र सदर आदेश कागदावरच राहिल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील तब्बल २६ जिल्ह्यांतील शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच गेली. आता दिवाळीनंतरच्या महिन्यातला पहिला आठवडा संपत आला तरीही पगार न झाल्याने शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचा आदेश १८ ऑक्टोबर रोजी काढला. मात्र प्रत्यक्षात वेतन अनुदान जिल्हास्तरावर वर्ग करताना केवळ ६० टक्केच रक्कम पाठविली गेली. म्हणून राज्यातील तब्बल पुणे जिल्ह्यासह
२६ जिल्ह्यांना दिवाळीपूर्वी वेतन शिक्षकांच्या बँक खात्यात जमाच करता आले नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाला हाती पैसा नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे, तर किमान नंतर १ तारखेला तरी वेतन होईल असे वाटत असताना आता पाहिला आठवडा संपला तरी वेतन जमा झाले नाही. यामुळे नाराजीत भरच पडली आहे.

महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून आता पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही एक तारखेला वेतन अदा करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत शिक्षण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
----------------
पुणे जिल्ह्यातील शिक्षक पगार स्थिती
तालुका - एकुण शाळा - पगार माहिती पाठविणाऱ्या शाळा - शिक्षक संख्या - एकूण वेतन
- आंबेगाव- २३६ - २३४ - ६९२ - ५०९७९१३०
२) बारामती- २८५ - २७८ - ७९९ - ६२७६५८३८
३) भोर- २७६ - २७४ - ६९६ - ४७४१९१३५
४) दौंड- २९६ - २९० - ९५१ - ६९६९९१०६
५) हवेली- २३१ - २२६ - ११०६ - ८३८४०६३६
६) इंदापुर- ३९७ - ३७७ - ९८४ - ७३०२५९४१
७) जुन्नर- ३५८ - ३५१ - १०१४ - ७५०४८९९८
८) खेड- ४०३ - ४०२ - १४५७ - १०६५९२१६८
९) मावळ- २९३ - २७२ - ८६३ - ६१४१०४००
१०) मुळशी- २२३ - २१३ - ७२६ - ४८४५७१६०
११) पुरंदर- २२४ - २१८ - ५८५ - ४४५९२४६३
१२) शिरुर- ३६७ - ३५७ - १२६४ - ९४४०४६१८
१३) वेल्हे- १५२ - १४३ - ३२९ - २०७९६३३६
एकुण- ३७४१ - ३६३५ - ११४६६ - ८३९०३१९२९
-