तरंगवाडी येथील कत्तलखान्यावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरंगवाडी येथील कत्तलखान्यावर छापा
तरंगवाडी येथील कत्तलखान्यावर छापा

तरंगवाडी येथील कत्तलखान्यावर छापा

sakal_logo
By

इंदापूर, ता. ८ : तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे इंदापूर-बारामती रस्त्याच्या दक्षिण बाजूला सुमारे एक किलोमीटर अंतरावर दाट झाडाझुडपांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई केली. याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याला फिर्याद दाखल केली आहे.
इंदापूर पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सिद्धाराम रामण्णा गुरव (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेवरून वालचंदनगर पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी घटनास्थळी जनावरे कापण्यासाठी दोन इंजिन असलेल्या लोखंडी मशिन, प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरलेली आतडी, बाजूचे मोकळ्या जागेत देशी, गीर व जर्सी गाई, बैल, वासरे कापून त्याची मुंडकी, पाय, धड, कातडी काढलेल्या अवस्थेत आढळली. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. ए. एस. तांबे यांनी पोलिस नाईक दाजी देठे यांच्यासह पंचनामा केला. उर्वरित मालाची दुर्गंधी पसरत असल्याने जागीच जे.सी.बी. मशिनच्या साह्याने खोल खड्डा खोदून पंचासमक्ष नष्ट केले.
याबाबत आरिफ यासीम कुरेशी, जाकर अब्दुलमजीद बेपारी (रा. इंदापूर), हजिमस्तान जाकीर बेपारी व सर्व जागा मालक (रा. इंदापूर) यांच्याविरूद्ध फिर्यादी दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केलेल्या सूचनेवरून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे अतुल खंदारे, शिवाजी निकम, बाळू पानसरे, शैलेश स्वामी, अमर थोरात, अमोल चितकोटे यांनी कारवाई करीत पुढील माहिती इंदापूर पोलिस ठाण्याला दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला.