प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडल्याने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडल्याने
राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस
प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडल्याने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडल्याने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

sakal_logo
By

इंदापूर, ता. ११ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्यातील वेतन शिक्षण संचालनालयाकडून जिल्हा परिषदांना वितरित केलेले असतानाही वेतन देण्याऐवजी त्या रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, थकीत वेतन आदी देयके दिली गेली. तर ऑक्टोबर महिन्यातील वेतन दिलेच नाही, अशा सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना राज्याच्या शिक्षण संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक शिक्षकांचे पगार रखडल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेतली गेली. तसेच किमान यापुढे तरी १ तारखेला पगार होतील, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होते.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी काढलेल्या नोटिशीनुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑक्टोबर महिन्यातील वेतनासाठी तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार इतकी रक्कम संचालनालय स्तरावरून वितरित केली होती. ती रक्कम केवळ शिक्षकांच्या नियमित वेतनासाठीच अदा करावी अन्य देयकांसाठी रक्कम खर्च करू नये, असा स्पष्ट आदेश संचालकांनी दिला होता. तरीही काही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाच्या रकमेतून फेब्रुवारी महिन्याचे थकीत वेतन, सातव्या वेतन आयोग हप्ता दिला. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी देयके दिली. त्यांच्याकडे शिक्षकांच्या वेतनासाठी पुरेशी रक्कम शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन शिक्षकांना दिलेच नाही. थकीत वेतनासाठी शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावेळी तेथील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाकडून वेतनाची रक्कम, अग्रिम थकीत महागाई भत्ता देयके आलीच नसल्याचे सांगितले. सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता, वैद्यकीय देयके आणि इतर देयके अदा केल्याचे दिसत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश मानला नाही तर याबाबतचा खुलासा करण्याची नोटीस दिली आहे. याबाबत १४ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेशही दिले आहेत.