बोगस महिला उभी करून इंदापुरात केले हक्कसोडपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस महिला उभी करून 
इंदापुरात केले हक्कसोडपत्र
बोगस महिला उभी करून इंदापुरात केले हक्कसोडपत्र

बोगस महिला उभी करून इंदापुरात केले हक्कसोडपत्र

sakal_logo
By

इंदापूर, ता. ११ : बनावट हक्कसोडपत्र बनवण्यासाठी बनावट ओळखपत्र आणि बोगस महिला उभी करून इंदापूर दुय्यम निबंधक यांच्यासह एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुमन नारायण भगत (रा. मळद, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर बोराटवाडी (ता. इंदापूर) येथील वडिलोपार्जित जमीन लाटण्यासाठी सख्खे भाऊ आणि बहिणींनी आपले बनावट ओळखपत्र बनवले. या बनावट ओळखपत्रासह आपल्या जागी सिंधूबाई दत्तात्रेय भगत या बनावट महिलेला दुय्यम निबंधक (इंदापूर) यांच्यापुढे उभे केले. त्याआधारे फेब्रुवारी २०२० मध्ये हक्कसोडपत्राचा बनावट दस्त (६७२/२०२०) बनवण्यात आला. याप्रकरणी गणपत जयवंत क्षीरसागर, पोपट जयवंत क्षीरसागर, बाळू जयवंत क्षीरसागर, भामाबाई दिलीप भगत, योगेश बाळू क्षीरसागर, ज्ञानेश्वर पोपट क्षीरसागर, नारायण बाबू क्षीरसागर, महादेव मारुती क्षीरसागर (सर्व रा. खोरोची, ता. इंदापूर), जनाबाई विष्णू खरात (रा. थोरातवाडी, सणसर, ता. इंदापूर) आणि सिंधूबाई दत्तात्रेय भगत (रा. तोंडले बोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.