नारायणदास विद्या मंदिरात बाल दिनानिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणदास विद्या मंदिरात
बाल दिनानिमित्त कार्यक्रम
नारायणदास विद्या मंदिरात बाल दिनानिमित्त कार्यक्रम

नारायणदास विद्या मंदिरात बाल दिनानिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

इंदापूर, ता. १२ ः इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत बालदिनानिमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी आयोजित केलेल्या छोट्या बाजारात चिमुकल्यांनी खरेदी व विक्रीचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची छोटी दुकाने प्रशालेच्या प्रांगणामध्ये लावली होती. यामध्ये भाजीपाला, फळे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, स्टेशनरी वस्तू अशा विविध वस्तुंची दुकाने लावण्यात आली होती. या वेळी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांचा वापर करत वस्तुंची खरेदी केली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, तसेच गणितीय संकल्पना लक्षात याव्यात म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड म्हणाल्या. या उपक्रमास नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.