फेरीवाल्यांनो, आत्मनिर्भर व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्यांनो, आत्मनिर्भर व्हा
फेरीवाल्यांनो, आत्मनिर्भर व्हा

फेरीवाल्यांनो, आत्मनिर्भर व्हा

sakal_logo
By

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता.१७ : आपला प्रपंच चालविण्याकरिता शहरात ठिकठिकाणी पथविक्रेते विविध व्यवसाय करताना दिसतात. कोरोनाकाळात या पथविक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प पडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. कोरोनाकाळ संपल्यानंतर नव्याने व्यवसाय सुरू करता यावा, याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली. या योजनेचा बहुतांश पथविक्रेत्यांनी लाभ घेतला असून, या माध्यमातून त्यांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. यापासून वंचित असलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

काय आहे योजना
नगरपालिका, नगरपंचायत किंवा महानगरपालिकांकडे नोंदणीकृत असलेल्या पथविक्रेत्यांना कोणत्याही तारणाशिवाय पहिल्यांदा दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर २० हजार रुपयांचे व याही कर्जाची नियमित परतफेड केल्यावर ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन नियमित कर्ज मिळणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्याना बँका सात टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतात.

कागदपत्रे कोणती लागतात?
या योजनेचा लाभ घेण्याकरिता केवळ दोन महत्त्वाची कागदपत्रे लागतात. त्यामध्ये मोबाइलसोबत लिंक असलेले आधार कार्ड व बँक खात्याचे पासबुक आवश्यक आहे. ही माहिती ऑनलाइन सादर करावी लागते.

अर्ज कोठे कराल?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
आहे. शहरात नगर परिषद, नगरपंचायतमध्ये जाऊन अर्ज करता येतो. शिवाय सेतू केंद्रातूनही अर्ज करण्याची सुविधा असून, पथविक्रेत्यांनी नोंदणी कारवी.

पहिल्या टप्प्यात कर्ज- १० हजार रुपये
दुसऱ्या टप्प्यात कर्ज- २० हजार रुपये
तिसऱ्या टप्प्यात कर्ज- ५० हजार रुपये
कर्जाचा व्याजदर- ७ टक्के