गरोदर माता, बालकांच्या तपासणी प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरोदर माता, बालकांच्या तपासणी प्राधान्य
गरोदर माता, बालकांच्या तपासणी प्राधान्य

गरोदर माता, बालकांच्या तपासणी प्राधान्य

sakal_logo
By

इंदापूर ता. २१ : जिल्हा परिषदेने ऊस मजुरांसाठी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गरोदर माता व बालकांची तपासणीस प्राधान्य देण्यात येत आहे. याचा फायदा सुमारे १ लाख ५० हजार ऊस तोडणी मजूर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना होणार आहे. आरोग्य विभागातर्फे संबंधितांची नोंद ठेवून उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे महिलांचे तसेच बालकांचे मृत्यू रोखले जाणार आहेत.

राज्यभरातून जिल्ह्यातील ऊसतोडणीसाठी आलेले मजूर साखर कारखाना परिसरात राहुट्या करून निवास करतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये गरोदर माता बालके तसेच विविध आजारांचे रुग्ण दरवर्षी आढळून येतात.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याची काळजी गेली काही वर्षापासून नियमितपणे घेतली जात आहे. हंगामासाठी आलेल्या ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहे.

१७ कारखान्याचे मजूरांना मिळणार लाभ
पुणे जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम २०२२- २३ साठी १८ कारखान्यानापैकी १७ कारखान्याचे गाळप सुरू असून यामध्ये प्रतिकारखाना नऊ ते दहा हजार ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबाला उपक्रमाचा लाभ होणार आहे.

आढळून येणारे रुग्ण
१. अतिजोखमीच्या गरोदर माता
२. लसीकरण न झालेली बालके
३. मधुमेह व उच्चरक्तदाबाचे रुग्ण


गरोदर मातांची होणारी नोंद
ऊस तोडणी मजुरांमधील गरोदर महिलांचे होणारे मृत्यू, अर्भक मृत्यू व मातामुत्युचे प्रमाण कमी करणे करिता गरोदर मातांची यादी तयार करून त्यांची नियमित आरोग्य तपासणी करीत व अहवाल सादर करावा लागणार आहे.

संस्थात्मक प्रसूती होण्यासाठी सर्वेक्षण
सर्व गरोदर मातांचे अपेक्षित प्रसूती तारीख व अपेक्षित प्रसूती ठिकाण यांचे पूर्व नियोजन करून संस्थात्मक प्रसूती होणे करिता पाठपुरावा करण्यात यावा याकरिता कार्यक्षेत्रातील आशांनी सर्वेक्षण करून गरोदर मातांची यादी तयार करावी, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी गरोदर मातांची नोंदणी करून त्यांची तपासणी करावी. वैद्यकीय अधिकारी यांनी अपेक्षित प्रसूती तारीख व अपेक्षित प्रसूती ठिकाण यांचे पूर्वनियोजन करून पाठपुरावा करावा व अति जोखमीच्या गरोदर मातांना गरज असल्यास संदर्भसेवा दयाही.

बालकांचे लसीकरण व आरोग्य तपासणी
आरोग्य मोहिमेअंतर्गत ऊस तोडणी मजुरांच्या बालकांचे संपूर्ण लसीकरण व आरोग्य तपासणी करण्याबाबत नियोजन करून १०० टक्के लसीकरण व आरोग्य तपासणी करण्यात यावी त्याप्रमाणे अहवाल सादर करावा. तसेच उर्वरित ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून एकत्रित अहवाल पाठवायचा आहे.

ऊस तोडणी मजूर व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विशेषतः अतिजोखमीच्या गरोदर माता, लसीकरण न झालेली बालके, मधुमेह व उच्चरक्तदाबाचे रुग्ण आढळून येतात. यांना वेळेत आरोग्य सेवा न मिळालेले अनेक प्रश्न निर्माण होतात. यामुळे जिल्हा परिषदेने सदर उपक्रम हाती घेतला असून यामुळे ऊस तोडणी मजुरांना वेळेत आरोग्य सुविधा मिळण्यास फायदा होईल.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

02364