इंदापुरात आठ डिसेंबरपासून शरद कृषी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात आठ डिसेंबरपासून शरद कृषी महोत्सव
इंदापुरात आठ डिसेंबरपासून शरद कृषी महोत्सव

इंदापुरात आठ डिसेंबरपासून शरद कृषी महोत्सव

sakal_logo
By

इंदापूर, ता.२४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुरात आठ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२२ रोजी शरद कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप गारटकर ही माहिती दिली. या वेळी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते. यावेळी गारटकर म्हणाले की, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा '' शरद कृषी महोत्सव २०२२'' आठ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इंदापूर शहरातील शंभर फुटी रोड, नवीन तहसील कचेरी शेजारी प्रांगणात होणार आहे. या महोत्सवात तब्बल २०० प्रकारचे विविध स्टॉल असणार आहेत. महाराष्ट्रातील नामांकित महत्त्वाच्या कृषी कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. तालुक्यातील शेतकरी घेत असलेल्या विविध पिकाच्या वाढीसाठी, परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन या कृषी महोत्सवात केले जाणार आहे. यासाठी नामांकित वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासह राज्यातील विविध आमदार, खासदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध चर्चासत्रांमध्ये डाळिंब, लिंबू वर्गीय फळबाग, पेरू यांसह दुग्ध व्यवसाय, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेळी मेंढी पालन व्यवस्थापन, फुले शेती भाजीपाला, हरितगृह आधुनिक तंत्रज्ञान यावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. दरम्यान, प्रगतशील शेतकरी थेट शेतकऱ्यांची संवाद साधणार असल्याने आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा लागणार आहे.०